जगाशी स्पर्धा करणारे मुल तयार करणं हे नवीन अभ्यासक्रमाच उद्दिष्ट;इयत्ता दुसरी पुनर्रचित अभ्यासक्रम वर्गाची सांगता चोपडा प्रतिनिधी (संपादक :...
जगाशी स्पर्धा करणारे मुल तयार करणं हे नवीन अभ्यासक्रमाच उद्दिष्ट;इयत्ता दुसरी पुनर्रचित अभ्यासक्रम वर्गाची सांगता
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव आयोजित इयत्ता २री वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण वर्गाला दिनांक २३ जून वार मंगळवार पासून बालमोहन विद्यालय,चोपडा येथे सुरुवात करण्यात आली होती ज्याची २५ रोजी सांगता झाली.
याकाळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावयाचा असल्यास त्याचा बोधात्मक,भावात्मक,क्रियात्मक विकास होणे गरजेचे असल्याचे मत विविध सुलभकांनी मांडले.हेच मुल जगाच्या स्पर्धेत टिकेल म्हणूनच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची रचना करण्यात आली आहे.
मराठी,इंग्रजी,गणित,आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयांची माहिती प्रशिक्षणार्थी यांनी यावेळी घेतली. नवीन शैक्षणिक धोरण हे प्राचीन भारतीय ज्ञान,परंपरा,संस्कृतीवर आधारलेले असून आनंददायी शिक्षण हाच अंतिम उद्देश शाळा व शिक्षण प्रक्रियेचा असणार आहे.
खेळ आणि कृती आधारित नवीन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
यातूनच अन्नमय कोश,मनोमय कोश, प्राणमय कोश,विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या पंचकोशांचा विकास होणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गट शिक्षणाधिकारी अजित पाटील, चहार्डी केंद्राचे केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे मंचावर उपस्थित होते.
तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशांत सोनवणे,मनोहर सोनवणे,जितेंद्र जोशी,प्रांजली पाटील,प्राची आमोदकर,माई काटे,सुनील मेश्राम,जीवनलाल वाडीले,रविराज शिंदे यांनी काम पाहिले.संचलन प्रशांत सोनवणे यांनी केले.

No comments