सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांची बदली.नूतन सपोनि गणेश फड यांची नियुक्ती सावदा/ रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकां...
सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांची बदली.नूतन सपोनि गणेश फड यांची नियुक्ती
सावदा/ रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांची जळगांव पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाली असून आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि गणेश पांडुरंग फड यांची सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सपोनि विशाल पुंडलिक पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर च्या कार्यकाळात सावदा पोलीस हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यात यशस्वी झाले त्यांनी सर्वधर्मसमभाव जातीय सलोखा एकता एकात्मता समता बंधुता भाई चारा जातीय सलोखा अबाधित ठेवून गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखविला अनेक गुन्हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे उघडकीस आणले याबाबत त्यांना तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी त्यांच्या कर्तृत्व, कारकीर्द उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना सन्मानपूर्वक सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सपोनि विशाल पाटील यांची कडक शिस्तप्रिय शिस्तबद्ध कार्यपध्दती त्यांच्या कार्य कर्तृत्व व कर्तव्याची छाप पाडून गेली.आता नव्याने रुजू होणारे सपोनि गणेश फड यांना आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कर्तव्य बजाविल्याचा अनुभव नक्कीच सावदा पोलीस स्टेशनमध्ये सेवाकाळात उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे

No comments