adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत विवरणपत्र दाखल न केल्यास रुपये दहा हजारांचा दंड !

 प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत  वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत विवरणपत्र दाखल न केल्यास रुपये दहा हजारांचा दंड ! शौकतभाई शेख / श्रीरामपूर (स...

 प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत 

वार्षिक विवरणपत्र दाखल करावेत


विवरणपत्र दाखल न केल्यास

रुपये दहा हजारांचा दंड !



शौकतभाई शेख / श्रीरामपूर


(संपादक : हेमकांत गायकवाड)

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम २०२३अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) प्रेस सेवा पोर्टल (PSP) वर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र सादर न करणाऱ्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांद्वारे कळविले आहे. 


          प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४ (१) (ब) व १४ (३) नुसार, वार्षिक विवरणपत्र निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधित प्रकाशकावर दंड आकारण्याची तरतूद आहे. पहिल्या चुकीसाठी किमान दहा हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली असल्याचे प्रेस रजिस्टार जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांमध्ये नमूद केले आहे.

        आर्थिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांनी ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन दाखल करावे. या मुदतीनंतर विवरणपत्र सादर न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल,असेही प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी सूचनांमध्ये नमूद केले आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments