फैजपूर येथे यामीन तडवीचा वाढदिवस उत्साहात साजरा जि.प. शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप इदू पिंजारी फैजपुर (संपा...
फैजपूर येथे यामीन तडवीचा वाढदिवस उत्साहात साजरा
जि.प. शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे सभापती हकीम तडवी यांचे सुपुत्र यामीन तडवी याचा दुसरा वाढदिवस मंगळवार, दि. २३ जून रोजी जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम केतन महाजन, शिक्षिका मनीषा अहिरे, तसेच फिरोज तडवी, जाकिर तडवी, पत्रकार सलीम पिंजारी, पत्रकार इदू पिंजारी, अशरफ तडवी, शकील तडवी, शरीफ तडवी, बबलू शेख, मुस्ताक शेख, सायबु तडवी, सत्तार तडवी, सावका तडवी, इमरान पिंजारी, पिंटू तडवी, वालिद खलील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांच्या आनंदी वातावरणात यामीन तडवीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक उपक्रमातून साजरा झालेल्या या वाढदिवसामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

No comments