adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील शासकीय पुरवठा अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वी झाले होते लग्न

यावल येथील शासकीय पुरवठा अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वी झाले होते लग्न  इदू पिंजारी  फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवा...

यावल येथील शासकीय पुरवठा अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; दोन महिन्यापूर्वी झाले होते लग्न 


इदू पिंजारी  फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील रहिवासी तथा यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेले तालुका पुरवठा अधिकारी सागर राजेंद्र तेली (वय ३०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १७ जून) दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे फैजपूर शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर तेली हे फैजपूर येथील सराफ कॉलनीतील रहिवासी होते. त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून शासकीय सेवेत प्रवेश केला होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्यांची यावल येथे तालुका पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

बुधवारी दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सागर तेली यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. एका होतकरू तरुण अधिकाऱ्याच्या अकाली निधनाने फैजपूर व यावल परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments