adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नालेसफाई रखडली; नागरिकांच्या तक्रारीनंतर रुचिता नाईक यांनी केली पाहणी

 नालेसफाई रखडली; नागरिकांच्या तक्रारीनंतर रुचिता नाईक यांनी केली पाहणी  अमोल बावस्कार मुंबई (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नालासोपारा, ता. २० ...

 नालेसफाई रखडली; नागरिकांच्या तक्रारीनंतर रुचिता नाईक यांनी केली पाहणी 


अमोल बावस्कार मुंबई

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नालासोपारा, ता. २० : वसई-विरार महापालिका क्षेत्रात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नालेसफाईची कामे सुरू असताना प्रभाग क्रमांक ११ मधील समेळपाडा परिसरातील अनेक नाल्यांची अद्यापही सफाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यामुळे मुसळधार पावसात पाणी तुंबण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्या रुचिता नाईक यांनी समेळपाडा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित विभागातील रखडलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि आरोग्याला प्राधान्य देत तातडीने नालेसफाईचे काम हाती घेण्याची मागणी त्यांनी केली. रुचिता नाईक म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनेक ठिकाणी नाले गाळ व कचऱ्यामुळे तुंबलेले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित गतीने काम होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

तसेच नागरिकांच्या मागणीची दखल घेत लवकरात लवकर संपूर्ण नालेसफाई पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी असा आरोपही केला की, काही वेळा नगरसेवकांच्या पाहणीपूर्वीच पालिका अधिकारी ठेकेदारांना सूचना देतात आणि तात्पुरती साफसफाई करून काम पूर्ण झाल्याचे चित्र निर्माण केले जाते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले अद्यापही गाळ व कचऱ्याने भरलेले असल्याचे दिसून येते. नाल्यांमध्ये वारंवार कचरा टाकला जात असल्याने पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचा प्रायोगिक उपाय राबविण्याची मागणी आपण महापौर अजीव पाटील यांच्याकडे करणार असल्याचे रुचिता नाईक यांनी सांगितले. परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि पावसाळ्यात पाणी साचणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून संबंधित यंत्रणेने नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments