भारत विद्यालय, न्हावीच्या नूतन मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके यांचा सत्कार इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर : न्हाव...
भारत विद्यालय, न्हावीच्या नूतन मुख्याध्यापिका सौ. संगीता फिरके यांचा सत्कार
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर : न्हावी येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झालेल्या सौ. संगीता ललितकुमार फिरके यांचा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन यांनी सौ. फिरके यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल लढे, चेअरमन प्रा. डॉ. के. जी. पाटील, संचालक संदेश महाजन तसेच विष्णू नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी सौ. फिरके यांच्या शैक्षणिक अनुभवाचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्याची ग्वाही दिली.

No comments