अंतुर्ली येथे 'राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम' उत्साहात संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी : किरण धायले संपादक : हेमकांत गायकवाड 'दो बू...
अंतुर्ली येथे 'राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम' उत्साहात संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी : किरण धायले
संपादक : हेमकांत गायकवाड
'दो बूंद जिंदगी की' या मंत्राचा उच्चार करत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतुर्ली येथे २०२६ सालची राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पडली. शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य श्री मोहन बेलदार व वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पाटील यांच्या हस्ते बालकांना लस देऊन करण्यात आले.
अंतुर्ली आणि परिसरातील शून्य ते पाच वयोगटातील जास्तीत जास्त बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य केंद्राने ठेवले होते.
लसीकरण मोहिमेसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये वैद्यकीय अधिकारी श्री शैलेश पाटील, श्री कृष्णा भोकरे आरोग्य निरीक्षक श्री आनंदा ठाकरे, आरोग्य सेवक श्री पवन बोदडे, श्री पंकज पवार, श्री प्रल्हाद राठोड श्री सुनील वानखडे, सर्व आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.
आरोग्य केंद्राच्या वतीने ज्या बालकांचे लसीकरण राहिले आहे, त्यांच्यासाठी लवकरच 'मोप-अप' राऊंड (सुटलेल्या बालकांसाठी विशेष फेरी) आयोजित केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
बालकांच्या आरोग्यासाठी पालकांनी दाखवलेला हा सहभाग कौतुकास्पद असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले

No comments