adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अंतुर्ली व परिसरात तिसऱ्यांदा मुसळधार पावसाने झोडपले

अंतुर्ली व परिसरात तिसऱ्यांदा मुसळधार पावसाने झोडपले मुक्ताईनगर प्रतिनिधी ::किरण धायले  (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुरली व परिसरात सतत ती...

अंतुर्ली व परिसरात तिसऱ्यांदा मुसळधार पावसाने झोडपले



मुक्ताईनगर प्रतिनिधी ::किरण धायले 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


अंतुरली व परिसरात सतत तीन दिवसापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे घरांमध्ये पाणी घुसले, गटारी तुडुंब भरल्या रस्त्याने चालता येणे कठीण झाले आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव ,चिखल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

       मुसळधार व अतिवृष्टी मुळे शेताची कामे खोडंबली आहे . शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .आधीच मागील आठवड्यात वादळी वाऱ्याने केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं त्यातच या पावसाने अजून जी केळीची झाडे उभी होती ती कोलमडून पडली आहे त्यामुळे केळी पिकाचे 100% नुकसान झालेले आहे. त्यासाठी पिक विमा कंपनीने अजूनही पंचनामे केलेले नाही. विमा कंपनी बनवाबनवी करीत आहे.शेतकरी अतिवृष्टी,आसमानी संकटांमुळे हतबल ,हताश , निराश झाला आहे.

No comments