adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाशिम येथे २४ जून रोजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी धरणे आंदोलन; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींनी सहभागी व्हावे – जगदीश मानवतकर

वाशिम येथे २४ जून रोजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी धरणे आंदोलन; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींनी सहभागी व्हावे – जगदीश मानवतकर  वाश...

वाशिम येथे २४ जून रोजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी धरणे आंदोलन; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींनी सहभागी व्हावे – जगदीश मानवतकर 


वाशिम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वाशिम : विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व शिक्षण व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कॉकरोज जनता पार्टीच्या वतीने 24 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते जगदीश मानवतकर यांनी दिली.
भारतामध्ये नीट (NEET), एमपीएससी, पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात वारंवार उद्भवणाऱ्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटीच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण यामुळे अनेक विद्यार्थी गंभीर अडचणींना सामोरे जात असल्याची बाब आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे.
कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी देशभर विविध ठिकाणी आंदोलन करीत असून सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथेही आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम येथे होणाऱ्या आंदोलनातून स्पर्धा परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, भविष्यात पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे तसेच अशा घटनांमुळे प्रभावित विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून लोकशाही मार्गाने शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जगदीश मानवतकर यांनी केले आहे. तसेच अखिल भारतीय ब्लू टायगर सेना, शहीद पोचीराम कांबळे क्रांती फोर्स, जगदीश मानवतकर ग्रुप, जगदीश मानवतकर मित्र मंडळ व कॉकरोज जनता पार्टीच्या वतीनेही नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments