अहिल्यानगर पोलीस दलात मोठा फेरबदल: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडून ५८ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस ठाण्यांना मिळाले नवे 'प्र...
अहिल्यानगर पोलीस दलात मोठा फेरबदल: पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडून ५८ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस ठाण्यांना मिळाले नवे 'प्रभारी'!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात अत्यंत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये नुकतेच बदल करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हा पोलीस दलातील 'सेकंड इन कमांड' म्हणजेच दुय्यम अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मोठी कुऱ्हाड कोसळली आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवारी (२२ जून) रात्री उशिरा एक आदेश जारी करत जिल्ह्यातील तब्बल ५८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यामध्ये ३ पोलीस निरीक्षक (PI), २१ सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि ३४ पोलीस उपनिरीक्षकांचा (PSI) समावेश आहे. या घाऊक बदल्यांमुळे अहिल्यानगर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नव्या अधिकाऱ्यांना संधी, जुन्यांना मुदतवाढ!
दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातून नव्याने बदली होऊन अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांना विविध महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नेमणुका देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे, काही अधिकाऱ्यांची उत्कृष्ट कामगिरी आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या कार्यकाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वर्षभरासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला अधिक गतिमान करण्यासाठीच ही 'सर्जिलकल स्ट्राईक' सदृश प्रक्रिया राबविण्यात आल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.
📌 बदली झालेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
१) पोलीस निरीक्षक (PI) - एकूण ३
राजेंद्र गुंजाळ (द.वि.प. अहिल्यानगर)
विजय देशमुख (जिल्हा विशेष शाखा - LIO)
संतोष भंडारे (नियंत्रण कक्ष)
२) सहायक पोलीस निरीक्षक (API) - एकूण २१
जगदीश मुलगीर (राहुरी)
सोमनाथ दिवटे (पारनेर)
संदीप वसावे (नेवासा)
पुनम श्रीवास्तव (कोतवाली)
वर्षाबाई जाधव (जामखेड - मुदतवाढ)
मंगेश गोटला (पाथर्डी)
गणेश अहिरे (श्रीगोंदा - मुदतवाढ)
रमीझ मुलाणी (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय)
अशोक काटे (कर्जत)
गणेश जाधव (कर्जत)
प्रदीप एकशिंगे (तोफखाना)
शंकर मुटेकर (शेवगाव)
विशाल चिटणीस (कोतवाली)
रोहन खंडागळे (पाथर्डी)
चेतन लोखंडे (श्रीरामपूर शहर)
विकास ढोकरे (संगमनेर शहर)
दीपक धनवटे (शनिशिंगणापूर)
अजिनाथ कोठाळे (आर्थिक गुन्हे शाखा - EOW)
नरहरी फड (आर्थिक गुन्हे शाखा - EOW)
अजित मोरे (जामखेड)
कल्पेशकुमार चव्हाण (शिर्डी)
३) पोलीस उपनिरीक्षक (PSI) - एकूण ३४
आण्णासाहेब परदेशी (अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा - मुदतवाढ)
प्रवीण पाटील (तोफखाना)
सुरज मेढे (संगमनेर शहर)
मनोहर खिळदकर (एमआयडीसी)
मनोज आहिरे (राहुरी)
विलास जाधव (शेवगाव)
समाधान फडोळ (आश्वी)
मनोज मोंढे (नगर तालुका)
शितल मुगडे (श्रीरामपूर शहर)
प्रदीप बोर्हाडे (शिर्डी)
फराहनाज पटेल (संगमनेर तालुका)
शलमोन सातपुते (अकोले)
आशिष चौधरी (लोणी - मुदतवाढ)
रंजीत मारग (पारनेर - मुदतवाढ)
सचिन लिमकर (श्रीगोंदा - मुदतवाढ)
कमलाकर चौधरी (कोपरगाव तालुका - मुदतवाढ)
विकास जाधव (स्थानिक गुन्हे शाखा - LCB)
कृष्णकुमार सेंदवाड (स्थानिक गुन्हे शाखा - LCB)
मंगेश नागरगोजे (नगर तालुका)
प्रवीण महाले (घारगाव)
रोशन निकम (श्रीरामपूर शहर - मुदतवाढ)
विनोद खांडबहाले (शेवगाव)
प्रियंका आठरे (भरोसा सेल - मुदतवाढ)
गजेंद्र इंगळे (कर्जत)
संदीप मुरकुटे (पाथर्डी)
दीपक मेढे (कोतवाली)
महादेव गुट्टे (शिर्डी)
अमोल गर्जे (एमआयडीसी)
समाधान सोळुंके (कोतवाली)
सुहास आव्हाड (भिंगार)
संदीप दरवडे (स्थानिक गुन्हे शाखा - LCB)
किशोर जाधव (सोनई)
गणेश आघाव (जामखेड)
किरण कोठुळे (सुपा)

No comments