adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी जाहिर माफी मागावी निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शब्बीरखान यांची मागणी ईमेल द्वारे केली मुख्यमंत्री कडे तक्रार

 खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी जाहिर माफी मागावी  निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शब्बीरखान यांची मागणी  ई...

 खा. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी जाहिर माफी मागावी 

निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शब्बीरखान यांची मागणी 

ईमेल द्वारे केली मुख्यमंत्री कडे तक्रार



 यावल (प्रतिनीधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ पत्रकार शब्बीर खान सरवरखान रा हिंगोणा ता यावल . यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जळगाव .जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक जळगाव .यांच्याकडे ई-मेलद्वारे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संबंधित वक्तव्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच खा. संजय दिना पाटील यांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत पत्रकारांचा सन्मान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण यासाठी शासनाने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

तक्रारीनंतर पत्रकार संघटना तसेच सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, शासन व संबंधित यंत्रणा या प्रकरणाची कितपत दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

No comments