adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची जागा पूर्ववत करण्याची मागणी; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची जागा पूर्ववत करण्याची मागणी; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन  अमोल बावस्कार बुलढाणा : (स...

 जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची जागा पूर्ववत करण्याची मागणी; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 


अमोल बावस्कार बुलढाणा :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध सामाजिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी राखीव असलेली ‘जिजामाता प्रेक्षागृहासमोरील’ जागा पुन्हा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सातपुडा क्रांती मंचाचे अध्यक्ष श्री. गणेश पांडुरंग इंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, नागरिकांचे प्रश्न, न्याय मागण्या व सामाजिक विषय प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने व उपोषणे केली जातात. मात्र, मागील काही काळापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाची जागा बदलून जिजामाता प्रेक्षागृहासमोरील जागा निश्चित करण्यात आली आहे. हा निर्णय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करणारा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात आंदोलनासाठी पूर्वीची जागा पुन्हा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली असून, यामागे महिला व बालिकांच्या सुरक्षिततेचा अभाव, रात्रीच्या वेळी अंधार, पोलिस बंदोबस्ताची अडचण, विषारी प्राणी व नैसर्गिक आपत्तीचा धोका, तसेच पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याचे कारणे देण्यात आली आहेत. प्रशासनाने आंदोलनाची जागा बदलण्याचा निर्णय मागे घ्यावा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूर्वीची जागा आंदोलने करण्यासाठी खुली करावी, अशी एकमुखी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

No comments