adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड  चोपडा प्रतिनिधी  (संपादक ...

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी महेश गायकवाड यांची निवड 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी पत्रकार तथा मुख्यसंपादक महेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

महेश गायकवाड हे सायंकाळ दैनिक एकता तसेच आवाज जय महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्य करताना अनेक अडचणी व टीकेला सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी आपल्या लेखणीच्या बळावर टीकाकारांना उत्तर देत समाजहिताचे कार्य सातत्याने सुरू ठेवले.

निवडीनंतर बोलताना महेश गायकवाड म्हणाले, "मनात जिद्द, चिकाटी आणि डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही. पद मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते. त्यामुळे संघटनेच्या पदाला शोभेल असे कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील."

त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून भविष्यात त्यांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments