adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जवसुलीच्या वादातून मानसिक छळ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 कर्जवसुलीच्या वादातून मानसिक छळ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल  चोपडा प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहर पोलीस ठाण्यात कर्जवसुली...

 कर्जवसुलीच्या वादातून मानसिक छळ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहर पोलीस ठाण्यात कर्जवसुलीच्या कारणावरून एका व्यक्तीस वारंवार फोन करून, प्रत्यक्ष भेटून शिवीगाळ व धमक्या देत मानसिक छळ केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासकीय सेवेत कार्यरत असून त्यांनी वैयक्तिक अडचणीमुळे काही व्यक्तींकडून वेळोवेळी रोख रक्कम व ऑनलाइन माध्यमातून आर्थिक व्यवहार केले होते. संबंधित रक्कम परतफेड केल्याचा दावा फिर्यादीने केला असतानाही अधिक व्याजाच्या मागणीसाठी वारंवार फोन, संदेश तसेच प्रत्यक्ष भेटून दबाव टाकण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, सन २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत चोपडा व शिरपूर परिसरात संबंधित प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. सततच्या मानसिक त्रासामुळे फिर्यादीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले असून उपचारानंतर पोलिसांकडे सविस्तर निवेदन देण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 296, 352, 351(2), 351(3), 3(5) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 चे कलम 39 व 45 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे हे करीत आहे.

No comments