adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सेवानिवृत्ती, वाढदिवस आणि नातीच्या स्वागताचा त्रिवेणी सोहळा; शिरसाड येथे शिवकीर्तनाने रंगली भक्तीमय संध्या

 सेवानिवृत्ती, वाढदिवस आणि नातीच्या स्वागताचा त्रिवेणी सोहळा; शिरसाड येथे शिवकीर्तनाने रंगली भक्तीमय संध्या   भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक ...

 सेवानिवृत्ती, वाढदिवस आणि नातीच्या स्वागताचा त्रिवेणी सोहळा; शिरसाड येथे शिवकीर्तनाने रंगली भक्तीमय संध्या  


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शिरसाड गावचे माजी उपसरपंच तथा विकास सोसायटीचे संचालक धनंजय एकनाथराव पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती, वाढदिवस आणि नात प्रिशाच्या स्वागतानिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर शिवकीर्तनाने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. धनंजय पाटील सर यांनी मुख्याध्यापक पदावर तब्बल ३० वर्षे ज्ञानदानाची सेवा बजावत ३१ मे रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर १ जून रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याचबरोबर त्यांच्या तीन महिन्यांच्या नात ‘प्रिशा’च्या स्वागतानिमित्त शिरसाड येथे भोजनाचा कार्यक्रम तसेच जाहीर शिवकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शिवकीर्तनकार ह.भ.प. संजीव महाराज सोनवणे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून धनंजय पाटील सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनावर प्रकाश टाकला. तसेच घरात आलेल्या चिमुकल्या प्रिशाच्या स्वागतानिमित्त आध्यात्मिक शुभेच्छा देत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

कीर्तनादरम्यान महाराजांनी उपस्थितांना देव, देश आणि धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा आढावा घेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. धनंजय पाटील सर हे यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे संचालक तेजस पाटील व तेजल पाटील यांचे वडील आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवृंद तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी धनंजय पाटील सर यांनी सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य धार्मिक व सामाजिक कार्यासाठी समर्पित करण्याबरोबरच नात प्रिशासोबत अधिकाधिक वेळ घालविण्याचा मानस व्यक्त केला. या त्रिवेणी सोहळ्यामुळे शिरसाड गावात आनंद, उत्साह आणि भक्तीचा संगम अनुभवायला मिळाला.

No comments