adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमदार अमोल दादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण

 आमदार अमोल दादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : रावेर-यावल...

 आमदार अमोल दादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय लोकनेते व हिंदुत्ववादी विचारांचे माननीय आमदार अमोल दादा जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त यावल शहरातील श्री तारकेश्वर प्राथमिक विद्यामंदिर तथा तारकेश्वर माध्यमिक विद्यालय येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आमदार अमोल दादा जावळे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचा सामाजिक व लोकहिताचा वारसा आमदार अमोल दादा जावळे समर्थपणे पुढे नेत असून, त्यांच्या कार्यामुळे ते कार्यकर्ते व जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.


हा सामाजिक उपक्रम भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून उत्साहात पार पडला.

यावेळी नगरसेविका शुभांगी रोशन येवले, डॉ. युवराज चौधरी, किशोर कुलकर्णी, जितू कोळी, मुकेश कोळी, बबलू घारू, विजू कासार, विजू गजरे, सुधाकर धनगर, वेंकटेश बारी, अतुल चौधरी, रोशन येवले, पिंटू फेगडे तसेच तारकेश्वर शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

No comments