adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोटारसायकल चोरीचा २४तासांत लावला छडा! दोन अट्टल मोटारसायकल चोर रावेर पोलीसांच्या ताब्यात. रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई :

 मोटारसायकल चोरीचा २४तासांत लावला छडा! दोन अट्टल मोटारसायकल चोर रावेर पोलीसांच्या ताब्यात. रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई :  रावेर प्रतिनिध...

 मोटारसायकल चोरीचा २४तासांत लावला छडा!

दोन अट्टल मोटारसायकल चोर रावेर पोलीसांच्या ताब्यात.

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलीस प्रशासनाने अवघ्या २४ तासांत मोटारसायकल चोरी  प्रकरणाचा छडा  लावत दोन अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद केले असल्याची यशस्वी कामगिरी केली आहे 

रावेर येथील मराठा मंगल कार्यालयातून चोरी गेलेली युनिकॉर्न हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे आणखी अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे 

रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत दोन अट्टल वाहनचोरांना खानापूर तालुका रावेर येथून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल तसेच आणखी एक संशयित चोरीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेर पोलीस ठाण्यात दि. २३ जून २०२६ रोजी गु.र.नं. ३२२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अतुल अर्जुन महाजन (वय ४२, रा. कुसुंबा, ता. रावेर) हे रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी आपली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (MH-19-DT-7111) मोटारसायकल शोधली असता ती जागेवर आढळून आली नाही. परिसरात चौकशी करूनही काही माहिती न मिळाल्याने त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचे फुटेज व चोरी गेलेल्या वाहनाचे फोटो विविध गावांतील व्हॉट्सअॅप गटांवर प्रसारित केले.

याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरीची मोटारसायकल खानापूर येथील दोन इसमांकडे दिसल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ खानापूर येथे जाऊन संशयितांचा शोध घेतला. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरीचे वाहन बऱ्हाणपूर रोडवरील हॉटेल काकाश्रीच्या मागील बाजूस असलेल्या वनक्षेत्रातील एका ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न तसेच विना क्रमांक प्लेटची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल मिळून आली. दुसरे वाहन नेमके कुठून चोरीस गेले आहे, याचा तसेच त्याच्या मालकाचा शोध सुरू आहे.

अटक आरोपी

समाधान शंभू रमेश जाधव (वय ३३)

मनोज भागवत चंदनकर (वय ३९)

दोघेही रा. खानापूर, ता. रावेर, जि. जळगाव.

जप्त मुद्देमाल

१५,००० रुपये किंमतीची होंडा युनिकॉर्न (MH-19-DT-7111)

१०,००० रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर (विना नंबर प्लेट, चेसीस नं. HA10ERGHD23656)

पोलिसांच्या मते, आरोपींकडून आणखी अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सखोल चौकशी सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण व सुकेश तडवी यांनी केली. पुढील तपास पो.हे.कॉ. समाधान ठाकूर करीत आहेत.

No comments