adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आडस-आसरडोह परिसरात शेतकऱ्याला लुटले, चोरट्यांकडून जबर मारहाण करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास

आडस-आसरडोह परिसरात शेतकऱ्याला लुटले, चोरट्यांकडून जबर मारहाण करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास धारुर प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) तालु...

आडस-आसरडोह परिसरात शेतकऱ्याला लुटले, चोरट्यांकडून जबर मारहाण करून ३ लाखांचा मुद्देमाल लंपास



धारुर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील ते आसरडोह शिवारातील शेतात राहणाऱ्या एका शेतकऱ्यावर ४ ते ५ अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री प्राणघातक हल्ला करून सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दत्ता अर्जुन डुमने असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दत्ता डुमने हे आपल्या शेतात वस्ती करून राहतात. रात्रीच्या सुमारास अंदाजे सव्वा दोनच्या दरम्यान ४ ते ५ चोरटे अचानक शेतातील घरी घुसले. त्यांनी अत्यंत क्रूरपणे डुमने यांना ताब्यात घेतले. चोरट्यांनी आरडाओरडा करू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापूस कोंबला आणि तोंडावर रुमाल बांधला. त्यानंतर, त्यांच्या डोक्यात दगडाने,पाठीवर,हातापायावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले.

डुमने यांना अचेत किंवा जखमी करून चोरट्यांनी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची लूट केली. यामध्ये शेड्या चोरट्यांनी शेतकऱ्याच्या मालकीच्या महागातल्या शेळ्या चोरून नेल्या आहेत.

जवळ असलेला मोबाईल फोन आणि घरातील रोख रक्कम चोरट्यांनी पळवला आहे.

एकूण नुकसान या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

​ही घटना समजताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.जख्मी दत्ता अर्जुन डुमने यांना अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु आहे.या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून, घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून, लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

No comments