adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विवरे बु. येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

 विवरे बु. येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन  विवरे बु., ता. रावेर (प्रतिनिधी): (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  विवरे बु. येथील किं...

 विवरे बु. येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन


 विवरे बु., ता. रावेर (प्रतिनिधी):

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 विवरे बु. येथील किंग क्रिकेट संघाच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत रावेर तालुक्यातील तब्बल ३२ विविध गावांतील क्रिकेट संघांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे परिसरात क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य विपीन दादा राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते गोपाळ दादा पाटील, सामाजिक कार्यकर्ते शामराव दादा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील, शरीफ तडवी, उपसरपंच विनोद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचे किंग क्रिकेट क्लबच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच विनोद मोरे यांनी केले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी किंग क्रिकेट क्लबचे आरिफ तडवी, इम्रान तडवी, आमिन तडवी, समीर तडवी, आसिफ तडवी यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत असून उद्घाटन प्रसंगी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी उपलब्ध होणार असून परिसरातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे.

No comments