adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

 डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान   इदू पिंजारी  फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर  वारकरी संप्रदायातील ख...

 डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान  


इदू पिंजारी  फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर  वारकरी संप्रदायातील खान्देशातील थोर परंपरा लाभलेली वै डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडीचे आज खानापूर येथून ज्ञानोबा तुकाराम नाम गजरात पंढरपूर कडे प्रस्थान झाले प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांच्याहस्ते  श्रीराम मंदिरात मूर्ती पूजन करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे  विश्वस्त किशोर बोरोळे  व अतुल तळले यांचे हस्ते वीणा व पताका पूजन करण्यात आले दिंडीचे नेतृत्व दुर्गादास महाराज नेहेते हे करीत असून विणेकरी भगवान महाराज चौधरी खानापूरकर विश्वभर महाराज अमोल महाराज भंजाले एकनाथ महाराज तासखेडकर गोपाळ महाराज संजय महाराज विट वे कर यांचे सहकार्य लाभले आहे प्रस्थान कार्यक्रमास भास्कर बॉंडे गणेश पाटील भूषण नारखेडे युवराज चोपडे  खानापूर ग्रामस्थ  भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिंडी खाणापूरहून पुढे चिनावल रोझोदा खिरोदा कलमोडा बोरखेडा न्हावी हुन हंबर्डी येथे मुक्कम नंतर भुसावळ खडका जामनेर सिलोड जालना बीड बार्शी मार्गे 23 दिवस पायी प्रवास करत आषाढी यात्रेला दिंडी पंढरपूर क्षेत्राला पोहचेल वै डिंगम्बर महाराज चिनावल कर मठात दिंडीचा मुक्काम राहील दरम्यान दररोज श्रीमद भागवत कथा व कीर्तने होतील  दिंडी स्थापना  वै डिंगम्बर महाराज चिनावल कर यांनी केली असून पुढे विठ्ठल महाराज हंबर्डी कर व अरुण महाराज बोरखेडेकर यांनी ही परंपरा चालविली विद्यमान काळात ही सेवा दुर्गादास महाराज नेहते करीत आहे

No comments