चोपडा नगरपरिषदेतर्फे पथविक्रेत्यांसाठी लोककल्याण मेळावा संपन्न पीएम स्वनिधी योजनेची माहिती,कर्ज सुविधा व डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन चोप...
चोपडा नगरपरिषदेतर्फे पथविक्रेत्यांसाठी लोककल्याण मेळावा संपन्न
पीएम स्वनिधी योजनेची माहिती,कर्ज सुविधा व डिजिटल व्यवहारांबाबत मार्गदर्शन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्यांसाठी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषद परिसरातील सीएलसी सेंटर येथे आयोजित या मेळाव्यात पथविक्रेत्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
मेळाव्यात पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणे,वित्तीय समावेशनाला चालना देणे,व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय कर्ज सुविधा,क्यूआर कोड उपलब्धता, क्रेडिट कार्ड वापर व डिजिटल व्यवहार याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात भारतीय स्टेट बँकेचे विशाल तांबे,आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद काकडे तसेच धरणगाव अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित वानखेडे यांनी उपस्थित पथविक्रेत्यांना मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे उद्घाटन चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,उपमुख्याधिकारी संजय मिसार,जतीन कुमार भारतीय स्टेट बँकेचे प्रतिनिधी,परिसरातील स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र,बँक ऑफ बडोदा आणि धरणगाव अर्बन बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समुदाय संघटक अरुण राजपूत,राजेंद्र गायकवाड,सीएलसी सहव्यवस्थापक संध्या देशमुख तसेच पूजा धेवर,सुवर्णा सोनार,मीना माळी,मालती शिंदे,सोनाली पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.






No comments