भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुदाम अप्पा कारंकाळ यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्त सत्कार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुदाम अप्पा कारंकाळ यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्त सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आयु.सुदाम रामदास करनकाळ हे राज्य परिवहन महामंडळातील प्रदीर्घ सेवा नंतर सेवानिवृत्त झाले आहेत,त्यानिमित्ताने त्यांना भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देवून सत्कार करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा व मंगलकामनादिल्यात!
सुदाम आप्पा एस.टी महामंडळामध्ये वाहक ( कंडक्टर )असताना प्रवासी यांच्या हिताची व सुखरूप प्रवासाची नेहमी तळमळ जोपासत प्रत्येक प्रवाशाची आपुलकीची भावना ठेवत आपल्या परिवहन महामंडळाचे भविष्य उज्वल करण्यासाठी दूरदृष्टीने कायम प्रयत्न करीत असत प्रवाशांच्या हितासाठी नेहमी स्वच्छ आणि चांगल्या विचारांची भूमिका ठेवून आपली सेवारत आपल्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचा अभिमान व गौरव वाटतो.
सुदाम आप्पा करनकाळ हे पुढे एस.टी महामंडळामध्ये पदोन्नतीने कंट्रोलर झालेत.. येथे सुद्धा निष्ठेने कार्य पार केलं. शाश्वत आपल्या सेवेची सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत तसेच बदललेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत सेवेचे व्रथ पार पडले.सुदाम आप्पांनी आपल्या नोकरीला तसेच सामाजिक,धार्मिक कार्यात नेहमी पुढाकार असतोच आपले मार्गदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यािारांना पुढे नेऊन डॉ.बबााेबआंबेडकरांनी आपल्या समाजासाठी मातृसंस्था दिली... त्या मातृसंस्थेत निष्ठेने कार्य करीत आहेत.भारतीय बौद्ध महासभेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदावरून आपल्या धम्माचा प्रचार-प्रसार धम्माची संस्कृती गावागावात नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच विचाराने आमच्यासारखे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन भारतीय बौध्द महासभेचे कार्य पुढे नेत आहोत. असे भरत शिरसाठ यांनी मनोगतात सुद्धा सुदाम आप्पा मनोगत व्यक्त केले.सेवानिवृत्तीनंतर अप्पानी आपल्या पहिले आपल्या कुटूंबास वेळ द्यावा.समाजाची,वंचितांची, गरिबांची सेवा आपल्या कार्यातून घडो हीच... आपणास सेवानिवृत्तीच्या व दीर्घायुष्याची मंगलकामना व्यक्त करतो.
भारतीय बौध्द महासभा चोपडा तालुक्याच्या वतीने सेवानिवृतीच्या हार्दिक शुभेच्छा.देण्यात आल्या
यावेळी सुदाम बाबुराव ईशी, एस. व्ही.करंदीकर,जानकीराम सपकाळे, रमेश सोनवणे, दिवाणजी साळूंखे, वसंत शिंदे, भरत शिरसाठ, राहुल बाविस्कर आदी भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments