अडावद केंद्रप्रमुख आधार पान पाटील यांचा एस. के. नगरवासीयांकडून गौरव चंद्रकांत पाटील, विचखेडा (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यात...
अडावद केंद्रप्रमुख आधार पान पाटील यांचा एस. के. नगरवासीयांकडून गौरव
चंद्रकांत पाटील, विचखेडा
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील मालखेडा येथील मूळ रहिवासी तथा सध्या अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेले आधार पान पाटील यांचा एस. के. नगर परिसरातील रहिवासी व छोटू वारडे मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
आधार पान पाटील यांनी यापूर्वी उच्च प्राथमिक शाळा, बोर-अजंती येथे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. नुकतीच त्यांची अडावद येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या निवासस्थानी २० जून रोजी सायंकाळी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अत्यंत मनमिळावू, हसतमुख व सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या पीएच.डी. धारक आधार पान पाटील यांच्याविषयी उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
या प्रसंगी भगवान (छोटू) वारडे, नितीन महाजन (उपकार्यकारी अभियंता, महावितरण), डॉ. जडे, खुशाल कंखरे (उपप्राचार्य), एम. पी. पाटील, नगरसेविका वंदनाबाई बाविस्कर, किरण महाजन, साहित्यिक राजेंद्र पारे, भरत शिरसाट (मुख्याध्यापक), चंद्रकांत महाजन सर, उदय गुजर सर, संतोष बाविस्कर सर, नंदू धनगर, डी. बी. पाटील सर, जितेंद्र मोरे, गोपाल कोळी, शालिग्राम करंदीकर, जितेंद्र वाल्हे, जानकीराम सपकाळे, दीपक मेढे सर, किरण चौधरी, रामचंद्र आखाडे, विकास पाटील, विनोद पाटील, सौ. छाया पान पाटील, अनिल शिरसाट, डॉ. ओंकार बनकर, देवानंद वाघ, अनिल वारडे, दिलीप चौधरी, संजय साळुंखे, विजय कढरे, सौ. सिंधुबाई पान पाटील, छगन सेना पान पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना आधार पान पाटील म्हणाले की, "अडावदकरांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत शैक्षणिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहे."
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भगवान (छोटू) वारडे यांनी केले.

No comments