adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गलंगी येथील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप

  गलंगी येथील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप मच्छिंद्र रायसिंग : प्रतिनिधी गलंगी, ता. चोपडा (संपादक : हेमका...

 गलंगी येथील दलित वस्तीत घाणीचे साम्राज्य; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप


मच्छिंद्र रायसिंग : प्रतिनिधी गलंगी, ता. चोपडा

(संपादक : हेमकांत गायकवाड)


तालुक्यातील गलंगी गावातील दलित वस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे लहान मुले, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

गलंगी हे गाव ब्रहानपुर – अंकलेश्वर मार्गालगत असून गावाजवळच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र, दलित वस्तीतील स्वच्छतेच्या समस्येकडे प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अनेकवेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

यासंदर्भात कैलास रणदिवे, रमाकांत रणदिवे तसेच परिसरातील महिला मंडळ,ज्येष्ठ नागरिकानी नाराजी व्यक्त केली आहे. दलित वस्तीतील साचलेले घाण पाणी व अस्वच्छतेमुळे मलेरिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला असून, भविष्यात एखादी आरोग्यविषयक दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

सध्या पावसाळा तोंडावर आला असून या मार्गावरून लहान मुले, महिला आणि रुग्णांना वारंवार ये-जा करावी लागते. मात्र, दुर्गंधीयुक्त वातावरण आणि साचलेल्या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतीने नियमित स्वच्छता मोहीम राबवून या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच भविष्यातील समस्या टाळण्यासाठी दलित वस्तीत बंदिस्त गटारीची उभारणी करण्यात यावी, अशी मागणीही काही ग्रामस्थांनी केली आहे.

No comments