adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चौगाव येथे दीपप्रकाश फाउंडेशनच्या शाळेचे उद्घाटन

 चौगाव येथे दीपप्रकाश फाउंडेशनच्या शाळेचे उद्घाटन  विश्राम तेले चौगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चौगाव येथील दीपप्रकाश फाउंडेशन संचालित K...

 चौगाव येथे दीपप्रकाश फाउंडेशनच्या शाळेचे उद्घाटन 


विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चौगाव येथील दीपप्रकाश फाउंडेशन संचालित KST Smart kids school (मातोश्री कल्पना ताई सखाराम तेले) या शाळेचे उद्घाटन दिनांक 11/6/026वार गुरुवार या रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला उद्घाटना चे प्रमुख पाहुणे म्हणून किसान  विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  मा . बापूसाहेब साहेब. अनिलबापु हिम्मतराव पाटील , महात्मा गांधी हायस्कूल लासूर चे मुख्याध्यापक मा. दादासाहेब. पाटील सर, लोकमत पेपरचे पत्रकार मा. अजय पालेवाल, निसर्गप्रेमी तथा नेशन महाराष्ट्रचे पत्रकार मा.विश्राम तेले, पाळधी गावचे ज्येष्ठ नागरिक मा.प्रकाश कळूबा धनगर, मा. भगवान काळे, व गावचे पोलीस पाटील श्री गोरख हरचंद्र पाटील, गावातील बहुसंख्या शिक्षण प्रेमी नागरिक,संस्थेचे सदस्य वामन शिंदे, अनिल पाटील, उपस्थित होते.दीपप्रकाश फाउंडेशन चे खजिनदार मा. सुनिल धनगर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष बापूसाहेब अनिल पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.


तसेच संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालिका दीपमाला सुनिल धनगर यांच्या हस्ते महात्मा गांधी हायस्कूल लासुर चे मुख्याध्यापक पाटील सर यांचा स्वागतसत्कार करण्यात आला इतर सत्कार झाल्याच्या नंतर अध्यक्षांनी  , पाटील सरानी मार्गदर्शन प्रत भाषण केले अजय पालेवाल यांनी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपमाला सुनिल धनगर यांनी या आधी घेत असलेल्या शेक्षणिक  उपक्रमांची माहिती दिली तसेच ही शाळा धनगर मॅडम यांनी किती कष्ट,संघर्ष, अनेक अडचणी ना त्या सामोरे गेल्या एक महिला असून कश्याप्रकारे  स्वतःच्या अथक प्रयत्ना तून ही शाळा सुरू  केली .त्याबद्द्ल त्यांचे मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या संचालिका दीपमाला धनगर मॅडम यांनी सर्व मान्यवराना व नागरिकांना हे आश्वासन दिले की या शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुसंस्कृत  आणि सर्व गुण संपन्न होईल तसेच गावातील बहुसंख्या विद्यार्थी हे शाळेत पाठवावे ही आग्रह विनंती केली.त्या नंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे  आभार व्यक्त केले व कार्यकमाची सांगता करण्यात आली

No comments