adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबीचा दणका! ४ ठिकाणी छापे टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त;जुगारी अन् अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले

 ​अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबीचा दणका! ४ ठिकाणी छापे टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त;जुगारी अन् अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले  सचिन मो...

 ​अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबीचा दणका! ४ ठिकाणी छापे टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त;जुगारी अन् अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने धडक मोहीम हाती घेतली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर आणि अकोले परिसरात मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत १ अवैध दारू विक्रेता आणि ३ जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून एकूण १,५६,७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.​पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले होते.या आदेशानुसार पोनि. मुटकुळे यांनी तातडीने एलसीबीचे एक विशेष पथक तयार केले.यामध्ये पोलीस अंमलदार अतुल लोटके,विष्णू भागवत,विजय पवार,गणेश लोंढे,रमिजराजा आत्तार,सागर ससाणे,बाळासाहेब गुंजाळ, अमोल आजबे,योगेश कर्डीले आणि चालक महादेव भांड, उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता.​दि.२३ जून रोजी या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर,श्रीरामपूर तालुका आणि अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. यामध्ये ३ ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश करण्यात आला,तर १ ठिकाणी अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली.या मोहिमेत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार ७७० रुपयांचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

No comments