adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लाडकी बहीण पैसे मिळवण्यासाठी केवायसी ची मुदत वाढवावी - सविता माळी.

 लाडकी बहीण पैसे मिळवण्यासाठी केवायसी ची मुदत वाढवावी - सविता माळी.  अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुख्यमंत्री लाडकी बहीण यो...

 लाडकी बहीण पैसे मिळवण्यासाठी केवायसी ची मुदत वाढवावी - सविता माळी. 


अरुण धनगर वरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक गरजू महिलांना मिळत नसल्याने KYC (केवायसी) प्रक्रियेसाठी अतिरिक्त मुदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख सविता माळी यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्ह्यातील अनेक गरीब व गरजू महिला केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. विशेषतः अशिक्षित आणि ग्रामीण भागातील महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच काही महिला पतीपासून विभक्त असून, त्यांच्याकडे पतीची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. यामुळे त्या महिलांनाही योजनेचा लाभ मिळत नसल्याची बाब निवेदनात अधोरेखित करण्यात आली आहे.

याशिवाय काही महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झालेली नसल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे सविता माळी यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांना किमान एक ते दोन महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्यात यावी. तसेच विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा, अशी मागणी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

No comments