पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात रिक्त पदे व भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी सीईओ यांना निवदेन अभाविप व बिरसा ब्रिगेडची संयुक्त मागणी ...
पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती संदर्भात रिक्त पदे व भरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी सीईओ यांना निवदेन अभाविप व बिरसा ब्रिगेडची संयुक्त मागणी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगांव जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात शिक्षक पदांचा घोळ झाला असल्याचे जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे
जळगांव जिल्ह्यातील 'पेसा' क्षेत्रातील शिक्षक भरती प्रक्रियेत एक मोठा तांत्रिक घोळ उघडकीस आला आहे. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, पेसा क्षेत्रातील मंजूर १७६ शिक्षक पदांच्या तुलनेत प्रत्यक्षात १७७ शिक्षक कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. मंजूर पदांपेक्षा एक शिक्षक अधिक कार्यरत असल्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे नवीन आदिवासी उमेदवारांच्या भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामदास भाईदास पावरा यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे.रिक्त जागांची संख्या शून्य दाखवण्यात आल्याने शासनाच्या ११ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार, ५० टक्के आरक्षणाच्या आधारे होणारी आगामी शिक्षक भरती कशी होणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील केवळ तीन तालुके आणि ३६ गावे पेसा क्षेत्रात येतात. या भागात विशेष वेतनश्रेणी व प्रोत्साहनपर भत्त्यांचा लाभ मिळत असल्याने अनेक बिगर-आदिवासी शिक्षक वर्षानुवर्षे येथेच ठाण मांडून असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. सेवानिवृत्ती व बदल्यांनंतरही या जागा रिक्त का दाखवल्या गेल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संदर्भात बिरसा ब्रिगेड आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य
कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. याची तातडीने दखल घेत 'सीईओ' यांनी शिक्षण विभागाची विशेष बैठक बोलावली. या बैठकीस यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार उपस्थित होते, त्यांनी आदिवासी उमेदवारांचे हित प्रशासनासमोर मांडले. यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक प्रशासकीय समायोजन करून पात्र आदिवासी उमेदवारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले. बैठकीला बिरसा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रामदास पावरा, उपाध्यक्ष उखा बारेला, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुराद तडवी, मजीत तडवी आदी उपस्थित होते.

No comments