|| आठवणीतील बाळासाहेब || लोकसेवक बाळासाहेब तथा मा. मधुकरराव चौधरी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित "आठवणीतील बाळासाहेब" हा क...
|| आठवणीतील बाळासाहेब ||
लोकसेवक बाळासाहेब तथा मा. मधुकरराव चौधरी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित "आठवणीतील बाळासाहेब" हा कार्यक्रम जळगाव येथे उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
बालभारतीची स्थापना, फिल्मसिटीची उभारणी, MMRDA ची संकल्पना, तापी पाणी वाटप करार, कमाल जमीन धारणा कायदा, डोक्यावरून मैला वाहून नेण्याची अमानुष प्रथा बंद करणे तसेच शिक्षण व सहकार क्षेत्रातील भरीव योगदान अशा अनेक ऐतिहासिक कार्यांमुळे बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
जळगाव जिल्ह्यासाठी हतनूर, सुकी, वाघूर सिंचन प्रकल्प, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र, ऑर्डनन्स फॅक्टरी, जळगाव आकाशवाणी केंद्र, जळगाव विमानतळ, जिल्हा दूध संघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांसारख्या महत्त्वाच्या विकासकामांमध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले. शिक्षण, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले.
या कार्यक्रमास मा.सुधाकर तांबे साहेब,मा.अरुणभाई गुजराथी, मा. आ. एकनाथराव खडसे, मा.रमेशकाका चौधरी, मा. विष्णूकाका भंगाळे,मा.श्रीरामकाका पाटील, मा.आ. सुरेश भोळे (राजूमामा), मा.शिरीषदादा चौधरी,मा.डॉ. अरविंद कोलते साहेब,मा. डॉ.उल्हासकाका पाटील, मा.सौ.रोहिणीताई खडसे, मा.उदयदादा पाटील,मा. मुफ्ती साहेब, मा. रमण भोळे, मा.जगदीश पाटील,मा. जमील शेख,मा.निलकंठराव गायकवाड,मा.सौ दिपमालाताई काळे,मा.ललितदादा पाटील तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. विकासाचा भगीरथ, लोकसेवक बाळासाहेब यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरत राहील.

No comments