adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूरमध्ये १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १४ जून रोजी

 मलकापूरमध्ये १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १४ जून रोजी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर – ...

 मलकापूरमध्ये १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १४ जून रोजी

अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर – येथील शतकोत्तरी श्री सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून रामभारती महाराज तसेच प्रा. दिलीप चव्हाण उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.

दहावी व बारावी परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमापूर्वी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा सत्कार समारंभ रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महावीर भवन येथे संपन्न होणार आहे. परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन शतकोत्तरी श्री सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments