adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनकडून बेवारस गायीला जीवदान; मांसात रुतलेले शिंग कापून केली सुटका

 एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनकडून बेवारस गायीला जीवदान; मांसात रुतलेले शिंग कापून केली सुटका पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ख...

 एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनकडून बेवारस गायीला जीवदान; मांसात रुतलेले शिंग कापून केली सुटका


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खामगाव शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गंभीर जखमेमुळे असह्य वेदना सहन करणाऱ्या एका बेवारस गायीची एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या सदस्यांनी धाडसी रेस्क्यू मोहीम राबवत सुटका केली. गायीचे स्वतःचे शिंग डोळ्याखालील मांसात खोलवर घुसल्याने ती अत्यंत आक्रमक बनली होती. मात्र जीवाची पर्वा न करता गौसेवकांनी तिला जेरबंद करून शिंग कापत प्राथमिक उपचार केले आणि तिचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गाय सुमारे दोन महिन्यांपासून गंभीर जखमेमुळे वेदना सहन करत होती. शिंग मांसात रुतल्यामुळे ती कोणालाही जवळ येऊ देत नव्हती. अनेक नागरिकांनी तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र गायीच्या आक्रमक स्वभावामुळे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

दरम्यान, गुरुवारी (दि. २५ जून) सायंकाळी एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनला या घटनेची माहिती मिळताच सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर गायीला बाळापूर फैल परिसरातील कासलीवाल लेआऊट येथील तिवारी यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले. या दरम्यान गाय वारंवार पळून जाण्याचा तसेच जवळ येणाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रयत्न करत होती.

यानंतर गौसेवकांनी काठी व दोरीच्या सहाय्याने गायीला सुरक्षितरीत्या नियंत्रणात घेतले. मांसात खोलवर रुतलेले शिंग आरीच्या साहाय्याने काळजीपूर्वक कापून काढण्यात आले. त्यानंतर जखमेवर खोबऱ्याचे तेल व हळद लावून प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर गायीच्या वेदना कमी झाल्याचे दिसून आले आणि तिला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितपणे सोडण्यात आले.

या धाडसी रेस्क्यू मोहिमेचे परिसरातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करत एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले की, "गौमाता दोन महिन्यांपासून असह्य वेदना सहन करत होती. तिची मदत करणे हे आमचे कर्तव्य होते. जीवाची पर्वा न करता आम्ही २४ तास सेवेसाठी तत्पर आहोत."

या धाडसी कार्याची सध्या खामगाव शहरात सर्वत्र चर्चा होत असून, सामाजिक बांधिलकीचे हे कार्य नागरिकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.

No comments