adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भवाळे येथे दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मका पीक शेती शाळेचा दुसरा वर्ग उत्साहात संपन्न

भवाळे येथे दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मका पीक शेती शाळेचा दुसरा वर्ग उत्साहात संपन्न    मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा  (संपादक...

भवाळे येथे दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मका पीक शेती शाळेचा दुसरा वर्ग उत्साहात संपन्न 

 
मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गलंगी परिसरातील मौजे भवाळे (ता. चोपडा) येथे दि. २५ जून रोजी कृषी विभागामार्फत व तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रॉप योजनेअंतर्गत मका पीक शेती शाळेचा दुसरा वर्ग उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात कृषी मंडळ अधिकारी एन. डी. जाधव यांनी मका पिकाची परिसंस्था, योग्य पीक व्यवस्थापन व उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी चेतन साळुंखे यांनी मका पिकाच्या संवेदनशील अवस्थांमध्ये घ्यावयाची काळजी व पीक संरक्षणाविषयी माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी राहुल साळुंखे यांनी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, त्याचा योग्य वापर व सेंद्रिय शेतीतील महत्त्व स्पष्ट केले. तसेच विलास मोरे यांनी दशपर्णी अर्काची निर्मिती, त्याचा वापर आणि त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. बीटीएम महिंद्र साळुंखे यांनी आत्मा योजनेअंतर्गत शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया व उपलब्ध लाभांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी भवाळेचे सरपंच आनंदराव पाटील, प्रगतशील शेतकरी अंबादास पाटील तसेच शेती शाळेतील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अंबादास पाटील यांनी शेती शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध तांत्रिक बाबी, परिणामकारक पीक व्यवस्थापन, सेंद्रिय उपाययोजना व आधुनिक शेती पद्धतींबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

No comments