adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव हर्षोल्लासात साजरा

 प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव हर्षोल्लासात साजरा   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रवेशोत्सव ...

 प्रकाश विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव हर्षोल्लासात साजरा  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

प्रवेशोत्सव हा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी शाळेत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आयोजित केला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. माध्यमिक शाळेत प्रवेशोत्सव  मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला जातो.

यावेळी शाळेच्या मुख्यप्रवेश द्वाराजवळ रांगोळी काढून सजावट करण्यात आली. मोठे वाघोदा निंभोरा वडगाव, दसनूर, आंदलवाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस.महाजन सर व  पर्यवेक्षक आर. पी .बडगुजर तसेच ज्येष्ठ शिक्षक बी.टी. सपकाळे सर, के .के .महाजन सर एल.बी घुगे सर  जे. आर. पाटील सर सौ. कल्पना पाटील मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले. शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व उत्साह दिसून आला.शासनामार्फत पुरवण्यात आलेल्या सेमी व मराठी माध्यमाच्या पुस्तकांचे   इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आत्मीयता निर्माण झालेली दिसून आली. पालकांचा शाळेवरील विश्वास दृढ असल्याने पहिल्याच दिवशी भरगच्च विद्यार्थी संख्या होती.

प्रसंगी शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन गोड पदार्थ म्हणून  शिरा देण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यां मध्ये उत्साह दिसून आला.

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षणप्रेमी पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर बंधु यांचे सहकार्य लाभले.

No comments