adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीमती अ. मु. साळुंखे प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

  श्रीमती अ. मु. साळुंखे प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न  चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा येथील...

 श्रीमती अ. मु. साळुंखे प्राथमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न


 चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील कस्तुरबा महिला समाज संचलित,कस्तुरबा बाल संस्कार केंद्र व श्रीमती अनुसयाबाई मुकुंदराव साळुंखे प्राथमिक विद्यालयात नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्व शिक्षक बंधु-भगिनी सकाळी उत्साहात शाळेत आले. शाळेचे आवार फुले व फुग्यांनी सजवलेले होते.

 मुले अतिशय उत्साहाने शाळेत येत होती. मुलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थी व पालकांचे स्वागत करण्यात आले. मुलांसोबत पालक सुद्धा उत्साहात शाळेत आले व कार्यक्रमात सहभागी झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे निरीक्षक श्री प्रमोद पाटील सर व श्री भूषण बिरारी सर उपस्थित होते सरांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी चांगले मार्गदर्शन केले यावेळी बीटीएस परीक्षेत जिल्हास्तरावर यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षिका भगिनींनी रांगोळी काढण्यासाठी परिश्रम घेतले. श्री राहुल पाटील सरांनी विद्यार्थी प्रवेश उत्सवाचे उत्कृष्ट फलकलेखन व बॅनर तयार केले. विद्यार्थ्यांसाठी श्री दीपक सोनार सरांनी सेल्फी पॉईंट तयार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा बाविस्कर मॅडम यांनी भूषविले सूत्रसंचालन श्री राठोड सर यांनी केले.

No comments