adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील श...

 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न 




जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

शिरसोली,येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ज्ञानविकास क्लासेस, शिरसोली यांच्या वतीने शिवराय चौक, शिरसोली येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.

स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, स्वच्छता, निसर्ग, सामाजिक विषय तसेच ऐतिहासिक वारसा यांसारख्या विविध विषयांवर आकर्षक व संदेशात्मक चित्रे रेखाटली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने आणि कलात्मकतेने उपस्थितांची मने जिंकली. अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्रकला सादर करून आपल्या कलागुणांचा ठसा उमटविला.

या कार्यक्रमादरम्यान मनीष पाटील सर, आरती पाटील मॅडम आणि चंचल पाटील मॅडम यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे समाजकारण, न्यायप्रिय प्रशासन, धार्मिक कार्य, जनकल्याणकारी धोरणे तसेच देशभरातील मंदिर, घाट, विहिरी आणि धर्मशाळांच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.

 उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानविकास क्लासेसचे संचालक मनीष पाटील सर, निकिता सचिन पाटील मॅडम, निकिता संदीप पाटील मॅडम, चंचल पाटील मॅडम, आरती पाटील मॅडम, लोकेश बारी तसेच राजेश पाटील सर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे नियोजन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि संपूर्ण कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी यासाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले.

तसेच स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सचिन पाटील यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील अनेक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले. यामध्ये ज्ञानेश्वर रमेश पाटील (वायरमन), ज्ञानेश्वर रमेश पाटील (ग्रामपंचायत क्लार्क), शेनफडू आबा पाटील, अनिल बारकू पाटील, अनिल महारू पाटील, भगवान दगा पाटील, पंढरीनाथ नारायण पाटील, ज्ञानेश्वर सुरेश पाटील तसेच भगवान परबत पाटील यांनी विशेष सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

यावेळी गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी ज्ञानविकास क्लासेसच्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये कला, संस्कार, सामाजिक जाणीव आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही अशा विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

– ज्ञानविकास क्लासेस, शिरसोली

"गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध."

No comments