adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचे आंदोलन

चोपडा येथे शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचे आंदोलन चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा, दि. १४ जून : चोपडा तालुका व शहर काँग्रेस क...

चोपडा येथे शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचे आंदोलन


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा, दि. १४ जून : चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले...

 शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, पिक विमा योजनेतील त्रुटी दूर कराव्यात तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे क्षेत्र प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी दाखविण्यात आल्याने त्यांना विमा भरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचा मुद्दा आंदोलनात उपस्थित करण्यात आला. पिक विमा दाव्यांचे पुनर्मूल्यांकन करून शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

तसेच महाराष्ट्र शासनाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लोकनियुक्त संचालक मंडळाऐवजी प्रशासक नेमून कारभार चालविण्याच्या निर्णयाचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून चालवल्या जात असताना प्रशासक नेमण्याचा निर्णय हा लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

या निर्णयामुळे बाजार समित्यांची स्वायत्तता कमी होऊन शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी व कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या हिताला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या या धोरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या निष्प्रभ होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी 

सरसकट कर्जमाफी द्या,

जाचक अटी रद्द करा!

शेतकरी विरोधी सरकार हाय हाय!

शेतकरी वाचवा, देश वाचवा!"

जोरदार घोषणाबाजी करून शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. शेतकरी हिताचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्यासह उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सेवादल अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे, शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे, माजी शहराध्यक्ष के.डी. चौधरी सर , माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील ,मधुकर बाविस्कर , धनंजय पाटील,शांताराम लोहार, शेतकीसंघ संचालक बाळकृष्ण पाटील,अशोक साळुंखे,शशिकांत साळुंखे,दीपक चौधरी,संदीप पाटील,देविदास सोनवणे,सुनील पाटील,महेश सोनवणे,डॉ.अशोक कदम,गोविंदा महाजन,लक्ष्मण कावेरी,भरत पाटील,विक्रम पाटील, सुतगिरणी संचालक देविदास सोनवणे, सुतगिरणी संचालक ॲड. एस.डी. पाटील,संदीप देसले,देवराम पाटील,देविदास साळुंखे,यशवंत खैरनार,युवराज कंखरे, प्रताप सोनवणे, विक्रम पाटील ,हमीद दादा, प्रवीण जैन, भूषण पाटील, मोहन पाटील ,प्रभाकर धनगर,प्रताप सोनवणे,ज्ञानेश्वर धनगर,शैलेशकुमार वाघ,विनोद धनगर,कैलास पटेल,मनोज पाटील,देविदास साळुंखे,जुनेद खान पठाण,राहुल पाटील,भूषण पाटील,भरत भालेराव,प्रमोद पाटील,विशाल पाटील,देविदास धनगर,सुभाष पाटील,सुमित पाटील,सुधाकर बाविस्कर,चंदू पाटील,मोहन पाटील,किरण सोनवणे,पुरुषोत्तम चौधरी,अविनाश पाटील,ज्ञानेश्वर कोळी,स्वानंद पाटील,उखा बारेला,इलियाज पटेल,अनिल सोनवणे,जितेंद्र कोळी,शेख इमरान रहीम,चंद्रकांत पाटील,समाधान पाटील,दिनेश पाटील,प्रदीप बाविस्कर,मुकेश पाटील,भागवत पाटील,रेवानंद पाटील,मयूर पाटील,गौरव पाटील,गोपाल पाटील,पिंटू बारेला,राकेश कावेरी,जीवन बागुल तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments