adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगावच्या 'एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन'चा राष्ट्रीय स्तरावर गौरव; संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांचा सलग सन्मान गौसेवा व रक्तदान क्षेत्रातील १४ वर्षांच्या निस्वार्थ कार्याची देशपातळीवर दखल; महाराष्ट्रानंतर बिहारमधूनही विशेष निमंत्रण

खामगावच्या 'एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन'चा राष्ट्रीय स्तरावर गौरव; संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांचा सलग सन्मान गौसेवा व...

खामगावच्या 'एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन'चा राष्ट्रीय स्तरावर गौरव; संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांचा सलग सन्मान

गौसेवा व रक्तदान क्षेत्रातील १४ वर्षांच्या निस्वार्थ कार्याची देशपातळीवर दखल; महाराष्ट्रानंतर बिहारमधूनही विशेष निमंत्रण 


पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गेल्या १४ वर्षांपासून गौसेवा व रक्तदान क्षेत्रात निस्वार्थपणे कार्यरत असलेल्या खामगाव येथील  'एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन' च्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची आता राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. हजारो गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून जीवनदान देणाऱ्या तसेच जखमी व निराधार गोमातांची सेवा करणाऱ्या या संस्थेला आणि संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांना विविध राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते सलग सन्मानित करण्यात येत आहे.

राजस्थानस्थित अरिहंतनाथ रक्त सारथी संस्था यांच्या वतीने मालाड (मुंबई) येथे आयोजित  'श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळ्या'त सामाजिक व रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल  'एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास कॅप्टन डॉ. सुरेश कुमार सैनी, प्रसिद्ध रक्तदाता विनय शेट्टी, अजित वहाडाणे, सिने अभिनेत्री पियू चव्हाण, जय साटेलकर, मंतोष मिश्रा, अभय तेलतुंबडे, सुरेश रेवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेच्या कार्याचा गौरव महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता बिहारमध्येही होत आहे. दि. २० जून २०२६ रोजी बिहार शरीफ येथे 'नालंदा ब्लड ग्रुप टीम' आयोजित 'रक्तदान सन्मान' कार्यक्रमात सुरजभैय्या यादव यांना विशेष निमंत्रित म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच दि. ४ व ५ जुलै २०२६ रोजी रोहतास (बिहार) येथील गोपाल नारायण सिंग युनिव्हर्सिटी, जमूहर येथे 'पथ प्रादर्शक' संस्थेतर्फे आयोजित 'रक्तदाता महाकुंभ-२ ब्लड डोनेशन फेस्टिव्हल-कम-कॉन्फरन्स'मध्ये महाराष्ट्रातून एकमेव विशेष निमंत्रित म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. स्व. इंद्र देव सिंह यांच्या ११व्या पुण्यतिथीनिमित्त हा राष्ट्रीय महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे.

संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन ने गेल्या १४ वर्षांत रक्तदान चळवळीतून हजारो गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून जीवनदान दिले आहे. संस्थेमार्फत २४ तास तातडीची रक्तसेवा, दुर्मिळ रक्तगटांसाठी रक्तदाते उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागात नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन तसेच जखमी व आजारी गोमातांवर उपचार करून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे.

यावेळी सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना सुरजभैय्या यादव म्हणाले, "हा सन्मान माझा एकट्याचा नसून 'एकनिष्ठा' परिवारातील प्रत्येक रक्तदाता, गौसेवक आणि रक्तदाते उपलब्ध करून देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. महाराष्ट्रासह बिहारसारख्या राज्यातून आमच्या कार्याची दखल घेतली जात आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांच्या सहकार्याने यापुढेही गौसेवा आणि रक्तदानाचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवू."

No comments