adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री त्वरित बंद करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नगरपरिषदेला मागणी शाळा व महापुरुषांच्या स्मारकांसमोर उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीविरोधात निवेदन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री त्वरित बंद करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नगरपरिषदेला मागणी शाळा व महापुरुषांच्या स्मारका...


बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री त्वरित बंद करा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नगरपरिषदेला मागणी

शाळा व महापुरुषांच्या स्मारकांसमोर उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीविरोधात निवेदन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

राकेश सोनार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
(अजित पवार गट) विद्यार्थी परिषद

भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल शहरातील बोरावल गेट परिसरात शाळा तसेच महापुरुषांच्या स्मारकांसमोर सुरू असलेल्या अनधिकृत व उघड्यावरील मांस विक्रीमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने यावल नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, बोरावल गेट परिसरात मराठी मुलींच्या शाळेजवळ मोठ्या प्रमाणावर चिकन, मटण व इतर मांसाची दुकाने उघड्यावर थाटण्यात आली आहेत. या विक्रीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपरिषदेने मांस विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केटची जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही संबंधित विक्रेते बोरावल गेट परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके असून, त्यांच्या समोर उघड्यावर मांस विक्री होणे अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांसह शिव-भिम अनुयायांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बोरावल गेट परिसरातील अनधिकृत मांस विक्री त्वरित बंद करावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच नगरपरिषदेने निश्चित केलेल्या अधिकृत मार्केटमध्ये त्यांचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली.

यामुळे परिसरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य तसेच महापुरुषांच्या स्मारकांचे पावित्र्य कायम राहण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

No comments