adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक योग दिनानिमित्त समाजसेवक देविदास शर्मा यांचा गौरवपूर्ण सत्कार

 जागतिक योग दिनानिमित्त समाजसेवक देविदास शर्मा यांचा गौरवपूर्ण सत्कार   पल्लवी पाटील खामगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आंतरराष्ट्रीय योग द...

 जागतिक योग दिनानिमित्त समाजसेवक देविदास शर्मा यांचा गौरवपूर्ण सत्कार 


 पल्लवी पाटील खामगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने खामगाव येथे आयोजित योग शिबीर महोत्सवादरम्यान समाजसेवक तथा श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने राष्ट्रीय एकता फाऊंडेशन, गुड मॉर्निंग ग्रुप, श्री सद्गुरू एकनाथ महाराज सार्वजनिक वाचनालय आणि पतंजली योग समिती, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, शिवाजीनगर येथे दि. १८ ते २१ जून २०२६ या कालावधीत भव्य योग शिबीर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात पतंजली योगपीठ, हरिद्वार आश्रम प्रशिक्षित योग शिक्षक राजेंद्रसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात गेल्या २६ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणारे देविदास शर्मा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गरीब व गरजू नागरिकांना मदत, धार्मिक उपक्रम, तसेच उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था यांसारख्या समाजोपयोगी कार्यांमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

देविदास शर्मा यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय महाराष्ट्र राज्य भूषण पुरस्कार, इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५, भारत गौरव पुरस्कार, विश्वकर्मा महाराष्ट्र रत्न पुरस्कार, महाराष्ट्र बहुजन रत्न, नॅशनल आयकॉन अवॉर्ड तसेच खामगाव अभिमान कृती पुरस्कार यांसह अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून हा सामुदायिक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष गणेश माने, नगरसेविका स्नेहल गरड, नगरसेविका रुपाली मुळीक, योग शिक्षक राजेंद्रसिंह राजपूत, रमाकांत गलांडे, पतंजली तालुका अध्यक्ष भिकाजी रेठेकर, अखिल भारतीय मराठा महासंघ क्रीडा विभाग जिल्हाध्यक्ष तथा वाचनालय अध्यक्ष विकास चव्हाण, राष्ट्रीय एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष गोलू ठाकूर, गुड मॉर्निंग ग्रुपचे नरेंद्र मावळे, राजेश अवचार, अनंता निळे, सूर्यकांत तोडेकर, राजेंद्रसिंह ठाकूर, विशाल पवार, सुनील भुसारे, श्रीकांत वैद्य, श्याम माळवदे, महादेव सुकाळे, लालाजी सांगळे, मंगेश भोपळे, सुनील सातव, रमेश लोढे, निलेश देवगिरीकर, संजय केळकर यांच्यासह असंख्य महिला-पुरुष उपस्थित होते.

कार्यक्रमात योग, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत उपस्थितांनी देविदास शर्मा यांच्या कार्याचे कौतुक केले.

No comments