adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बालमोहन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते : डॉ सुधीर चौधरी

 बालमोहन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते : डॉ सुधीर चौधरी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेम...

 बालमोहन विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते : डॉ सुधीर चौधरी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : "निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी, मन शांत आणि विचार सकारात्मक बनतात," असे प्रतिपादन योग मार्गदर्शक डॉ. सुधीर चौधरी यांनी केले. ते अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय, चोपडा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात बोलत होते.

दि. २१ जून २०२६ रोजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख दिपक पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगत निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. 


कार्यक्रमात विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ललित सोनवणे, कैलास पाटील तसेच रविंद्र साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय व कृतीयुक्त पद्धतीने उभे राहून, बसून तसेच पाठीवर व पोटावर झोपून केली जाणारी विविध योगासने सादर केली. प्रत्येक आसनाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व आणि त्यांचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

योग दिनाचे औचित्य साधून 'क्लायमेट वॉरियर चोपडा' यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाची शपथही उपस्थितांना देण्यात आली. त्यामुळे योगाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका स्मिता बाविस्कर यांनी केले. यावेळी शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

No comments