छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स (भाजी मार्केट) प्रकल्पाची पाहणी; तांत्रिक बाबींवर चर्चा भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ...
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स (भाजी मार्केट) प्रकल्पाची पाहणी; तांत्रिक बाबींवर चर्चा
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शहरातील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स (भाजी मार्केट) प्रकल्पाच्या अनुषंगाने आज संबंधित स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी जळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य पाटील सर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी काळे साहेब, निलेश बारी तसेच शिवसेना गटनेते नगरसेवक सागर चौधरी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा तसेच भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांना अधिक चांगल्या आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रकल्पामुळे भविष्यात शहराच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच नागरिकांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments