adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय गावाबाहेर हलविण्यास नागरिकांचा विरोध

 त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय गावाबाहेर हलविण्यास नागरिकांचा विरोध    प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक : हेमकांत गायकवाड) त्र्यंब...

 त्रंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय गावाबाहेर हलविण्यास नागरिकांचा विरोध 


  प्रतिनिधी जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या विकासकामांच्या नावाखाली गावातील उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर गावाबाहेर चार ते पाच किलोमीटर हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे समोर येत आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहर तसेच परिसरातील ग्रामीण जनतेमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. उपजिल्हा रुग्णालय शहराच्या बाहेर गेल्यावरती सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसाठी आधार असलेले उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित केल्यास विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होतील वैद्यकीय उपचार तपासणी यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वेळेत पोहोचणे शक्य होणार नाही उपजिल्हा रुग्णालय केवळ उपचारांसाठी असते असे नाही तर विविध प्रकारचे दाखले शिबिर लसीकरण कुपोषित बालकांसाठी गर्भवती महिलांसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी देखील उपजिल्हा रुग्णालयात उपक्रम राबवले जातात. नागरिकांचा विकास कामाला कोणताही विरोध नाही.

​ *नागरिकांच्या मुख्य अडचण?* 

​प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक आणि ग्रामीण नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. "रुग्णालय गावातच हवे!" आणि "सुविधा आमची हक्काची!" रुग्णालय गावाबाहेर गेल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय सेवा वेळेत कशा मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

​निर्णयाचे जनतेवर होणारे दुष्परिणाम:

​नागरिकांनी आणि आंदोलकांनी या निर्णयाचे खालील गंभीर दुष्परिणाम प्रशासनासमोर मांडले आहेत:

​तातडीच्या सेवेत उशीर: रुग्णालय दूर गेल्यामुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण होईल.

​गरीब रुग्णांची गैरसोय: गावातील आणि ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना उपचारासाठी शहराबाहेर जाणे त्रासदायक ठरेल.

​प्रवासाचा खर्च वाढणार: दूर अंतरावर जाण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.

​आपत्कालीन परिस्थितीत धोका: वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

​दुर्बल घटकांची चिंता: गर्भवती महिला, वृद्ध आणि अपंग रुग्णांचे हाल होणार असून, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार 

​जनतेचा एकच आवाज आणि इशारा:

"रुग्णालय गावाबाहेर हलवून जनतेची सेवा थांबवू नका! रुग्णालय गावातच ठेवण्यात यावे, अन्यथा सर्वसामान्य जनता मिळून आंदोलन करणार आहेत

​निष्कर्ष: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात विकासकामांना महत्त्व देताना स्थानिक जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन या लोकभावनेची दखल घेऊन हा निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments