adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अत्यावश्यक संच वाटपासाठी १०० रुपयांची लाच घेताना भाग्यश्री पाटील एसीबीच्या जाळ्यात

 अत्यावश्यक संच वाटपासाठी १०० रुपयांची लाच घेताना भाग्यश्री पाटील एसीबीच्या जाळ्यात  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव-:-  ...

 अत्यावश्यक संच वाटपासाठी १०० रुपयांची लाच घेताना भाग्यश्री पाटील एसीबीच्या जाळ्यात 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव-:-  महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वाटप करण्यासाठी १०० रुपयांची लाच स्वीकारताना भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा, जि. जळगाव) हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी शासनाच्या योजनेंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी ३ जून २०२५ रोजी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानंतर ४ जून रोजी संच ताब्यात घेण्यासाठी वावडदा (ता. जळगाव) येथील केंद्रावर गेले असता, तेथे कार्यरत भाग्यश्री पाटील हिने संच देण्यासाठी दोन फॉर्म विकत घेण्याचे सांगून त्यासाठी १०० रुपयांची मागणी केली. शासनाकडून हे संच लाभार्थ्यांना विनामूल्य देण्यात येत असल्याची माहिती अर्जावर स्पष्ट नमूद असूनही लाचेची मागणी करण्यात आली.

तक्रारदारांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. वावडदा येथील संच वाटप केंद्रावर भाग्यश्री पाटील हिने तक्रारदाराकडून १०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून एकूण २६,६७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यामध्ये ५००, २००, १००, ५०, २० व १० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. तसेच लाचेची स्वीकारलेली १०० रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह एसीबी जळगाव व नंदुरबार येथील अधिकाऱ्यांचा सहभाग होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास त्वरित एसीबीकडे तक्रार नोंदवावी.

No comments