वादळातील केळीपीकासह नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रकांत पाटील कृषी, महसूल प्रशासनाला दिले आदेश रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपा...
वादळातील केळीपीकासह नुकसानीचे तातडीने पंचनामे करा - आ.चंद्रकांत पाटील
कृषी, महसूल प्रशासनाला दिले आदेश
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल दिनांक ४ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आठवडाभरात दोन वेळा झालेल्या या अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा बुद्रुक शिवारात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने दखल घेत महसूल, कृषी व संबंधित प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांमध्ये त्वरित पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण व पंचनामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी भाजप पदाधिकारी श्री राहुल पाटील,ग्राम महसुल अधिकारी श्री.मधुराज पाटील यांनी केली व तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानीचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments