adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

​फकीर गल्लीत स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई २५ हजारांची खिमा मशीन, मांसासह लाखोंचा मुद्देमाल जप्त ३ खाटीक गजाआड मुख्य सूत्रधार फरार!

 ​फकीर गल्लीत स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई २५ हजारांची खिमा मशीन, मांसासह लाखोंचा मुद्देमाल जप्त ३ खाटीक गजाआड मुख्य सूत्रधार फरार!  स...

 ​फकीर गल्लीत स्थानिक गुन्हे शाखेची थरारक कारवाई २५ हजारांची खिमा मशीन, मांसासह लाखोंचा मुद्देमाल जप्त ३ खाटीक गजाआड मुख्य सूत्रधार फरार! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या एका धक्कादायक प्रकाराचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने पर्दाफाश केला आहे.शहरात गुप्तपणे सुरू असलेल्या एका अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास अचानक छापा टाकला.या छाप्यादरम्यान गोवंशीय जनावरांची कत्तल रंगेहात पकडण्यात आली असून, घटनास्थळावरून सुमारे ७६,५०० रुपयांच्या मुद्देमालासह ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे,अरविंद भिंगारदिवे,सुनील पवार,शाहिद शेख,गणेश धोत्रे आणि योगेश भिंगारदिवे यांचे एक विशेष पथक शहरात गस्तीवर होते.​दि.२८ मे २०२६ रोजी रात्री एलसीबीचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना,त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. अहिल्यानगर शहरातील मिसगर लायब्ररीच्या समोर असलेल्या फकीर गल्लीच्या बोळीत,एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची ती माहिती होती.

​माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता थेट फकीर गल्ली गाठली.पथकाने अत्यंत सावधगिरीने त्या पत्र्याच्या शेडभोवती वेढा घातला.पोलिसांनी खिडकीतून व आडोश्याने पाहिले असता, आतमध्ये काही इसम जनावरांची कत्तल करत असल्याचे विदारक दृश्य समोर आले.पोलिसांनी कसलाही विचार न करता थेट शेडचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि तिथे उपस्थित असलेल्या आरोपींना जागीच घेरले.​पोलिसांनी घटनास्थळावरून मुनावर फकीर सय्यद (वय ४० वर्षे),नविद रफिक कुरेशी (वय ३० वर्षे),सलीम फय्याज अहमद कुरेशी (वय ३३ वर्षे)

(सर्व रा.सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर) अशा तीन आरोपींना ताब्यात घेतले.

​पोलिसांनी जेव्हा या तिघांकडे कडक चौकशी केली,तेव्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला.हा कत्तलखाना त्यांचा नसून ते आयुनल फयाज अहमद कुरेशी (रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट,अहिल्यानगर) याच्या सांगण्यावरून हे काम करत होते.पोलीस छापा पडल्याचे समजताच मुख्य सूत्रधार आयुनल कुरेशी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.​पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मांस आणि कत्तलीचे साहित्य मिळून आले.जप्त करण्यात आलेल्या ७६,५०० रुपयांच्या मुद्देमालात खालील वस्तूंचा समावेश आहे:

​गोमांस: ४६,००० रुपये किमतीचे एकूण २३० किलो मांस.​खिमा मशीन: २५,००० रुपये किमतीची स्टीलची आधुनिक खिमा बनवण्याची मशीन.​इलेक्ट्रिक वजन काटा: ५,००० रुपये किमतीचा काटा.

​कत्तलीची हत्यारे: ५०० रुपये किमतीचे सुरा, सत्तुर आणि टोचा.​याप्रकरणी आरोपीं विरुद्ध तोफखाना शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) आणि प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(ब), ५(क), ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार मुख्य आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.​सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरातील अवैध मांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments