adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाई भाई ​चिकन सेंटरच्या नावाखाली सुरू होता 'हा' काळा धंदा..! पोलिसांनी टाकला छापा; मुख्य सूत्रधार फरार,मध्यप्रदेशचा तरुण जेरबंद..!

 भाई भाई ​चिकन सेंटरच्या नावाखाली सुरू होता 'हा' काळा धंदा..! पोलिसांनी टाकला छापा; मुख्य सूत्रधार फरार,मध्यप्रदेशचा तरुण जेरबंद..! ...

 भाई भाई ​चिकन सेंटरच्या नावाखाली सुरू होता 'हा' काळा धंदा..! पोलिसांनी टाकला छापा; मुख्य सूत्रधार फरार,मध्यप्रदेशचा तरुण जेरबंद..!


​सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील  विसापूर येथे चिकन विक्रीच्या दुकानाच्या आडोशाने सुरू असलेल्या एका धक्कादायक काळ्या धंद्याचा बेलवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.गांजासारख्या अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या एका अड्ड्यावर पोलिसांनी धडक छापा टाकला.या कारवाईत मध्यप्रदेशातील एका तरुणाला गांजा विकताना रंगेहात अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ७८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. मात्र,पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे.​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीविरुद्ध बेलवंडी पोलिसांनी मोहीम उघडली आहे.दि.२८ जून २०२६ रोजी बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) नंदकुमार सोनवलकर यांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली.विसापूर येथील अमीन शफी शेख हा इसम आपल्या 'भाई भाई चिकन सेंटर' या दुकानात ग्राहकांना बेकायदेशीरपणे गांजा विकत असल्याची ती माहिती होती.​माहिती मिळताच एपीआय सोनवलकर यांनी तात्काळ पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले आणि विसापूर येथील 'भाई भाई चिकन सेंटर'वर छापा टाकला. पोलिसांनी दुकानात प्रवेश केला तेव्हा तिथे चिकनच्या व्यवसायाच्या आडून गांजाची सर्रास विक्री सुरू असल्याचे समोर आले.​पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा विक्री करणाऱ्या गुंजीलाल कान्हा मेहता (वय २४ वर्षे,रा.शेंदवा, तहसील शेंदवा,जिल्हा बडवानी,मध्यप्रदेश) या तरुणाला जागीच ताब्यात घेतले.त्याच्या झडतीत पोलिसांनी ७८० ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य जप्त केले आहे.​या कारवाईदरम्यान पोलिसांनी गुंजीलाल मेहता याला अटक केली असली,तरी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि चिकन सेंटरचा मालक अमीन शफी शेख (रा. विसापूर) हा पोलिसांची गाडी येताना पाहून अत्यंत हुशारीने तिथून पसार झाला.तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला असून,पोलीस आता त्याच्या शोधात आहेत.

​अंमली पदार्थ (गांजा) स्वतःच्या कब्जात बाळगून तो व्यावसायिक उद्देशाने विक्री केल्याप्रकरणी आरोपींवर बेलवंडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या (NDPS Act) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीची चौकशी सुरू असून,फरार अमीन शेख याला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

​सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस ठाण्याचे API नंदकुमार सोनवलकर,पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे,भाऊसाहेब शिंदे,पोलीस शिपाई दादा क्षीरसागर,विनोद पवार आणि विठ्ठल खरमाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे विसापूर परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments