adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान केळी पीक भुईसपाट शेतकरी हवालदिल !

 रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान केळी पीक भुईसपाट शेतकरी हवालदिल !  मुबारक तडवी रावेर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मान्सूनच्या आगमना ...

 रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचे थैमान केळी पीक भुईसपाट शेतकरी हवालदिल ! 


मुबारक तडवी रावेर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मान्सूनच्या आगमना अगोदरच आठवडा भरात सलग दुसऱ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसल्याने रावेर तालुक्यातील शेतकरी राजाच्या तोंडी आलेल्या घास हिरावला असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

रावेर तालुक्यातील अनेक ठिकाणी बुधवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेकडो एकर केळीच्या बागाचे नुकसान झाले होते.त्यासोबतच सोमवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पूर्वभागातील मोठा वाघोदा बुद्रुक, सावदा रसलपूर, केऱ्हाळा, भोकरी, अहिरवाडी पाडला, निरूळ, खानापूर, चोरवड, अजनाड, आठवडा, नेहता दोधा, नेहता व तापीकिनाराला वादळी पाऊस व जोरदार वादळाने सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.वार्यामुळे काही ठिकाणी झाडे ही उन्मळून  काहीवेळ वाहतूक ठप्प  झाली होती. 


या वादळात शेकडो हेक्टर केळी व अन्य पिंकाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातील केळी पट्टा असलेल्या रावेर तालुक्यात पुन्हा वादळी पावसाचा तडाखा बसल्याने केळी पिकांचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे मोठे संकट उभे राहिले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

 रावेर तालुक्यातील सावखेडा, खिरोदा, धामोडी, कांडवेल मोठा वाघोदा बुद्रुक सह आसपासच्या परिसरात वादळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेकडो एकरवर असलेले केळी पीक उद्ध्वस्त होऊन जमीनदोस्त झाले आहे.महसू्ल व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील केळी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी रावेर कृषी विभागाच्या गव्हाने मॅडम, तलाठी मधुराज पाटील राहुल काशिनाथ पाटील, ग्रामपंचायत अधिकारी हरीश तायडे, कोतवाल मुशिर तडवी आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते

No comments