adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्ञानदानाच्या प्रदीर्घ प्रवासाला विराम; आर. एस. पाटील यांचा गौरव सोहळा उत्साहात

ज्ञानदानाच्या प्रदीर्घ प्रवासाला विराम; आर. एस. पाटील यांचा गौरव सोहळा उत्साहात  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:...

ज्ञानदानाच्या प्रदीर्घ प्रवासाला विराम; आर. एस. पाटील यांचा गौरव सोहळा उत्साहात 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा: नीलकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आडगाव हायस्कूल, आडगाव येथे शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक आर. एस. पाटील (राजेंद्र सुखदेव पाटील) यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पी. सी. (आबा) पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट सुनील डोंगर पाटील, कवी-लेखक तथा साहित्यिक रमेश जे. पाटील, आडगावचे माजी सरपंच विजय (ताराचंद) तुकाराम पाटील, मुख्याध्यापक विजय मगरे, उपसरपंच प्रताप पाटील, योगराज पाटील, दामोदर पाटील, माजी संचालक भरत दत्तात्रय पाटील, मंगल वासुदेव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात पी. सी. पाटील यांनी आर. एस. पाटील यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांची एक सक्षम आणि सुसंस्कृत पिढी घडविल्याचे सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. विविध वक्त्यांनीही त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासातील योगदानाचा उल्लेख करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आर. एस. पाटील व त्यांच्या पत्नींचा गावातील विविध संस्था, संघटना आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबाळे यांनी केले. समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments