adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात पल्स पोलिओ जनजागृती रॅली उत्साहात 'दोन थेंब जीवनाचे'चा संदेश देत विद्यार्थ्यांनी गावभर काढली जनजागृती फेरी

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात पल्स पोलिओ जनजागृती रॅली उत्साहात 'दोन थेंब जीवनाचे'चा संदेश देत विद्यार्थ्यांनी गावभर काढली ज...

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात पल्स पोलिओ जनजागृती रॅली उत्साहात

'दोन थेंब जीवनाचे'चा संदेश देत विद्यार्थ्यांनी गावभर काढली जनजागृती फेरी




कमळगाव  प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेनिमित्त दि. २८ जून २०२६ रोजी अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पल्स पोलिओ लसीकरणाचे महत्त्व, त्याचे आरोग्यदायी फायदे तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देणे किती आवश्यक आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर विद्यालयाच्या वतीने संपूर्ण गावातून पल्स पोलिओ जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी "दोन थेंब जीवनाचे", "प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या", "पोलिओमुक्त भारत घडवूया" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत ग्रामस्थांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण केली.

या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष नानासो मधुकर चिंधु धनगर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, आशा स्वयंसेविका, ग्रामस्थ तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या जनजागृती रॅलीमुळे गावातील पालकांमध्ये पल्स पोलिओ लसीकरणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त भारत घडविण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

No comments